रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

पिंपरी,  (प्रतिनिधी) – रेल्वेची धडक बसून एका 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
स्थानकानजीक मृतदेह असल्याची माहिती एका दक्ष नागरिकाने पोलिसांना दिली. वय 25 वर्ष, उंची 5 फूट 4 इंच, उभा चेहरा, गळ्यात ताईत, अंगावर राखाडी रंगाचा व त्यावर तपकीरी पट्टे असलेला सदरा व आकाशी पॅन्ट असा त्याचे वर्णन आहे. रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)