रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

तळेगाव दाभाडे – एक्‍स्प्रेस रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे – घोरावाडी लोहमार्गावर घडली. वृषाली विवेक घाटकर (वय 26, रा. चिखली प्राधिकरण, पुणे), असे रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली घाटकर यांचे सासर वसई (पश्‍चिम), पालघर असून त्या माहेरी चिखली प्राधिकरण येथे राहात होत्या. त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची गरज होती. त्या सोमवारी सकाळी घरातून नोकरीच्या शोधात निघाल्या होत्या. सायंकाळी सहाच्या सुमारास रेल्वे गाडीची धडक बसल्याने घाटकर यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस हवालदार संजय तोडमल व प्रियांका नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास लोहमार्ग पोलीस करीत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)