रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी – लोहमार्ग ओलांडत असताना हैद्राबाद एक्‍स्प्रेसने उडवल्याने एकाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.28) सकाळी साडे नऊच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.

अपघातात चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्याने तसेच कोणतीही कागदपत्रे न सापडल्याने मृताची ओळख पटू शकली नाही. मृताचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, केस काळे असे वर्णन आहे.

-Ads-

हिरव्या काळ्या उभ्या रेषांची नक्षी असणारा पूर्ण बाह्यांचा शर्ट, सॅन्डो बनियन, राखाडी रंगाची पॅन्ट असे कपडे होते. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास पिंपरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)