रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी– धावत्या रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (रविवारी) सकाळी नऊच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ झाला. इसमाची ओळख अद्याप पटली नाही.
रेल्वे पोलीस मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्थाकाजवळ एका रेल्वे मालगाडीच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटली नाही. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 38 वर्ष, उंची पाच फूट चार इंच, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सडपातळ, केस काळे, दाढी वाढलेली. अंगात पांढ-या रंगाचा फूल शर्ट, निळसर रंगाची फूल पॅन्ट असा पोशाख आहे.
मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)