रेल्वेच्या देखरेखीसाठी जीआयएसची मदत 

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या अनेक मालमत्ता, ज्यात प्रामुख्याने जमीनींचा, त्यांची देखरेख, व्यवस्थापन आणि जपणूक करण्याची गरज आहे. देशभर पसरलेल्या या मालमत्तांचे जीआयएस नकाशांच्या मदतीने संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याचा निर्णय, रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या पद्धतीने नकाशे तयार करून त्यानुसार रेल्वेचे पोर्टल तयार केले जाणार आहे.

या नकाशांचे काम प्रगतीपथावर असून ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या संदर्भात रेल्वे माहिती यंत्रणा केंद्राशी सामंजस्य करार केला आहे. उपग्रह इसरोच्या मदतीने केले जाणार असून, त्यासाठी इसरोसोबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे. जीआयएस पोर्टल विकसित केल्यानंतर, इसरोच्या मदतीने मिळणाऱ्या उपग्रह छायाचित्रणावरून रेल्वेच्या जागांवर झालेली अतिक्रमणे शोधून काढता येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)