रेल्वेच्या डब्यांच्या उत्पादनात मोठी वाढ

नवी दिल्ली -भारतीय रेल्वेने मेक इन इंडियाला प्रोत्साहन देत उत्पादनाबाबत विक्रम स्थापित केला आहे. भारतीय रेल्वेच्या इंटेग्रल कोच फॅक्‍टरीने फेब्रुवारी अखेरपर्यंत 2,239 कोचचे उत्पादन घेतले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा 2,500 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 2,234 कोचचे उत्पादन घेण्यात आले होते. रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षितमतेवर अधिक भर देण्यात येत आहे. अपघातावेळी कमीत कमी जीवितहानी व्हावी अशी या डब्यांची रचना आहे. या डब्ब्यांचे तिपटीने उत्पादन घेण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 2016-17 मध्ये एलएचबी प्रकारातील डब्यांचे उत्पादन 400 होते, 2017-18 मध्ये ते 1100 वर पोहोचले आहे.

इन्टेग्रल कोच फॅक्‍टरीच्या चेन्नईतील प्रकल्पातून ट्रेन 18 आणि ट्रेन 20 चे उत्पादन घेण्यात येणार आहे. यामुळे या कारखान्याची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. ट्रेन 18 चे चालू वर्षात उत्पादन घेण्यास प्रारंभ होईल. ही नवीन साखळी 16 डब्यांच्या ट्रेनची जागा घेणार असून ती संपूर्णतः वातानुकुलित आहे. 160 किमी वेगाने धावता येणाऱ्य़ा या ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजा, आधुनिक स्वच्छतागृह, इंटिरिअर लायटिंग प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. गेल्या वर्षात रेल्वेचे वाढते अपघात पाहता धोकादायक असणारे जुने डबे 2018 च्या मध्यावधीपासून उत्पादन बंद करण्यास इंटेग्रल कोच फॅक्‍टरीला सांगण्यात आल्याचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले. याऐवजी लिंक-होफमॅन-बुश (एलएचबी) प्रकारातील डब्यांचा वापर वाढविण्यात येणार आहे.

सध्या जुन्या डब्यांचा वापर एकूण 60 हजार पैकी 40 हजार आहे. उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील अत्याधुनिक कोच फॅक्‍टरीने गेल्या वर्षात मंत्रालयाला दरवर्षी एलएचबी डब्यांची उत्पादन क्षमता 1 हजारपासून 5 हजारपर्यंत नेण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. भारतीय रेल्वेची सध्या 4 हजार एलएचबी डब्यांची उत्पादन क्षमता आहे. सध्या 20 हजार एलएचबी डब्याचा वापर करण्यात येतो. देशात सर्व एलएचबी डबे वापरण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)