नवी दिल्ली  – पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करणे हे आता भारतीय रेल्वेचे एक प्रतीक झाले आहे. आपल्या हरित उपक्रमाचा अधिक प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वेने जुलै 2016 मध्ये भारतीय उद्योग संघासोबत (सीआयआय) भागीदारी सुरू केली. भारतीय रेल्वेचे उत्पादन कारखाने, कार्यशाळा आणि इतर विभागांमध्ये हरितमार्गाचा अवलंब करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी याच भागीदारी अंतर्गत सीआयआय या विभागांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे.

सीआयआयची ग्रीनको मूल्यांकन प्रणाली ही जगातील एकमेव मूल्यांकन प्रणाली आहे जी कंपन्यांना त्यांची एकंदर हरित कामगिरी सुधारण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देते. ग्रीनको ऊर्जा क्षमता, नवीकरणीय ऊर्जा, जल संवर्धन, कचरा व्यवस्थापन, स्रोत संवर्धन आदी महत्त्वपूर्ण पर्यावरण मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते. आतापर्यंत भारतीय रेल्वेच्या 42 उत्पादन कारखाने आणि कार्यशाळांमध्ये ग्रीनको मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)