रेल्वेचे रुपडे पालटणार ; भारतीय रेल्वे स्थानके विमानतळांसारखी स्वच्छ होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रवाशांचे लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे दिसत आहेत. आजपर्यंत रेल्वेकडून प्रवाशांना तिकीट आणि सेवेविषयी चांगल्या सुविधा दिली आहे. त्यातच आता लवकरच दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची अगदी विमानतळांसारखी चकाचक रेल्वे स्थानके प्रवाशांच्या सेवेला येणार आहेत. मध्य प्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकांचे  काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून महिन्याच्या सुरुवातीला लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे.

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (IRSDC) IRCON आणि RLDA यांच्या संयुक्त विद्यमाने या स्थानकांची जबाबदारी घेतली आहे. रेल्वे मंत्रालय या प्रोजेक्टसाठी जबाबदार असणार आहे. आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस के लोहिया यांनी याविषयी माहिती दिली. हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तर गांधीनगर स्थानकाचं काम ९ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण  होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)