रेल्वेचे जनरल तिकीटही आता अॅपवर

पुणे विभागात शुक्रवारपासून वापरता येणार अॅप

पुणे – रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले असून मोबाइल अॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी केवळ “यूटीएस’ नावाचे अॅप प्रवाशांना डाऊनलोड करावे लागणार आहे. पुणे विभागाअंतर्गत प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून शुक्रवारपासून (दि.12) ही सेवा सुरू होणार आहे.

-Ads-

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये अनारक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी प्रथमच मोबाइल अॅपवर तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांना प्लेस्टोरवरुन “यूटीएस’ अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यावर आपले नाव, मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी लागले. यानंतर ऑनलाइन पेमेंटद्वारे कुठलाही प्रवासी असे तिकीट काढून प्रवास करू शकतो. स्थानक परिसरापासून 2 किलोमीटर अंतरापर्यंत अॅपद्वारे हे तिकीट काढता येणार आहे. तसेच, प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसाने पकडल्यास मोबाईलमधील तिकीटाचा फोटो दाखवून सुटका करता येऊ शकते. एकदा तिकीट बूक केल्यानंतर परत तिकीट दाखवताना प्रवाशाला नेटवर्कची गरज पडणार नाही. अनेकदा रेल्वेमध्ये नेटवर्क समस्या असते. मात्र, तिकीट बूक केल्यानंतर ते ऑफलाइनही पाहता येऊ शकते.

असे काढा अॅपवरुन तिकीट
– प्लेस्टोरवरुन “यूटीएस’ अॅप डाऊनलोड करा.
– नाव, मोबाइल नंबर, शहराचे नाव, आयडी नंबर आदी भरा.
– यानंतर मोबाइलवर ओटीपी येऊन युझर आयडी तयार होईल
– यानंतर युझरचे आर-वॉलेट तयार होईल. याचा उपयोग पेमेंट करण्यासाठी असेल.
– यानंतर तुम्ही तुमचे अनारक्षित तिकीट काढू शकता.

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)