रेल्वेचा आता “कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्‍युरिटी प्लॅन’

– रेल्वे स्थानकावरील सुरक्षा सुधारणार
– शहर पोलीस, आरपीएफ, जीआरपीचा संयुक्‍त आराखडा

गणेश राख

पुणे –
 रेल्वे स्थानकावरील वाढत्या असुरक्षित घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आता कडेकोट सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. यावर प्रशासनाने “कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्‍युरिटी प्लॅन’ अर्थात व्यापक सुरक्षा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी रेल्वे पोलीस (आरपीएफ), शहर पोलीस, आणि “जीआरपी’ फोर्स हे संयुक्तरित्या काम करत आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना नुकतीच घडली. यानंतर येथील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस सरसावले असून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वेसह इतर व्यवस्था कशी तत्काळ मदत करू शकेल, यासाठी या आराखड्यात इतरांना सामावून घेण्यात आले आहे. सध्या रेल्वे स्थानकावर येण्यासाठी मुख्य गेटसह इतर अनेक मार्ग आहेत. यामुळे कोणीही सहजतेने प्रवेश करू शकतो. त्यामुळे काही भिंती कायमस्वरुपी बंद करणे, आवश्‍यक तेथे गेट निर्माण केले जाणार आहे. यासाठी स्थानिक पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांची मदत घेण्यात आली आहे.

या उपायोजना करणार
– महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हींची संख्या वाढवणे
– आवश्‍यक तेथे गेटची निर्मिती करणे
– अनावश्‍यक आणि घुसखोरीचे मार्ग बंद करणे
– इन, आऊट गेट ठरवणे

स्थानिक पोलीस, जीआरपीच्या मदतीने कडेकोट सुरक्षेसाठी सेक्‍युरिटी प्लॅन तयार करणे रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी आवश्‍यक त्या समित्या तयार करण्यात आल्या असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल. यानंतर योग्य त्या सुधारणा केल्या जातील.
– डी. विकास, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे प्रशासन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)