रेल्वेकडून “श्री रामायण एक्‍स्प्रेस’ची घोषणा

14 नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ
नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपने पुन्हा एकदा “जय श्रीराम’चा नारा दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने जनतेला रामायण काळात घेऊन जाण्यासाठी नवीन टुरिस्ट ट्रेन “श्री रामायण एक्‍स्प्रेस’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रामायणाचे संदर्भ असणाऱ्या ठिकाणांची सफर ही ट्रेन घडवणार आहे.

रामायणातील महत्वाच्या स्थळांना जोडणारी 16 दिवसांची ही यात्रा असणार आहे. दिल्लीहून 14 नोव्हेंबरला ही रेल्वे सेवा सुरु होणार आहे. ही रेल्वे दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन रवाना होणार असून रेल्वेमंत्री पियूष गोयल याला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या रेल्वेतून एकावेळी 800 प्रवासी प्रवास करु शकतात.

भारत आणि श्रीलंकेमधील रामाशी जोडलेल्या सर्व स्थळांना भेट द्यायची असेल तर 16 दिवसांचे पॅकेज आहे. यात भारत आणि श्रीलंकेतील सर्व महत्त्वपूर्ण स्थळांना भेट दिली जाईल. सुरुवातीला आयोध्या, हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर या ठिकाणी रेल्वे जाईल. त्यानंतर रेल्वे नंदिग्राम, सीतामढी, जनकपुर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपुर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल.

त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल. केवळ भारतातील ठिकाणांना भेट देण्यासाठी 15,120 रुपये, तर श्रीलंकेला जाण्यासाठी चेन्नईतून कोलंबोला जावे लागणार आहे. या प्रवाशांना 36,970 रुपये अतिरिक्‍त भरावे लागणार आहे.

रामायण एक्‍सप्रेसची वैशिष्ट्ये
– रामजन्मभूमी अयोध्या ते श्रीलंकेपर्यंत 16 दिवसांचा हा प्रवास असेल.
– या पॅकेजमध्ये खाण्यापिण्याची, निवासाची सोयही असेल. तर पर्यटन स्थळी फिरण्यासाठी काही इतर सेवा रेल्वे उपलब्ध करुन देणार आहे.
– ज्यांना श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित ठिकाणे पाहायची आहेत, त्यांना चेन्नईहून कोलंबोपर्यंत विमानाने प्रवास करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)