रेल्वेकडून ‘नो बिल, फ्री फूड’ पॉलिसी सुरु

मुंबई : भारतीय रेल्वेने तुमचा प्रवास चविष्ट करण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. ‘नो बिल, फ्री फूड पॉलिसी’ लॉन्च केली आहे. म्हणजेच, तुम्ही रेल्वेचा वापर करून प्रवास करत असाल आणि या प्रवासादरम्यान तुम्ही रेल्वेकडून जेवण मागवले पण त्याचे बिल तुम्हाला दिले गेले नाही तर तुम्ही बिलच भरू नका, असे निर्देशच रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेमध्ये अनेकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर त्याचे बिल दिले जात नाही… इतकंच नाही तर प्रवाशांकडून अनेकदा अधिक किंमत वसूल केली जाते. हे व्यवहार बंद व्हावेत यासाठी रेल्वे प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.  कोणत्याही प्रवाशाने आता प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर केल्यास वेंडरला बिलाची मागणी करावी. एखाद्या वेंडरने बिल देण्यास नकार दिला तर प्रवाशांनी जेवणाचे पैसे देऊ नये, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.  ज्या रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या सर्व रेल्वेमध्ये या नव्या पॉलिसीची नोटीस ३१ मार्चपासून लावण्यात येणार आहे. ही योजना योग्य रितीने कार्यरत होईल, याची जबाबदारी रेल्वे इन्स्पेक्टर्सकडे देण्यात येणार असल्याचेही रेल्वे विभागाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)