पुणे – केरळमध्ये आलेल्या पुरस्थितीनंतर त्याठिकाणी मदत कार्य पोहचविण्यात मध्य रेल्वेने मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आत्तापर्यंत म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत तब्बल 849.23 टन साधन सामग्री रेल्वेने केरळला पाठविण्यात आली आहे. ही साधन सामग्री घेऊन मध्य रेल्वेच्या पाच विभागातून 35 विशेष रेल्वे गाड्या केरळला आत्तापर्यत गेल्या आहेत.

देशांतून या नागरिकांसाठी मदत दिली जात होती. त्याचवेळी ही मदत पोहचविण्याची मोठी जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने स्वीकारली. मध्य रेल्वेने ही पुढाकार घेऊन ही सर्व साधन सामग्री मोफत केरळ मध्ये पोहचविण्यात येईल, अशी व्यवस्था केली. मदतीचा ओघ मध्य रेल्वेकडे सुरू झाला. अनेकांनी रेल्वे मार्फतच साधन सामग्री पोहचवली. मध्य रेल्वेच्या पाच विभागातून हे काम सुरू होते. सर्वाधिक साधन सामग्री ही भुसावळ विभागातून तब्बल 351.88 टन पाठविण्यात आली. मुंबई विभागातून 317.35 टन साधनसामग्री तर, पुणे विभागातून 131.30 टन सह चार पार्सल वॅगन पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपला एक दिवसाचा पगार हा केरळ आपतग्रस्तांनी दिला होता. तब्बल 6 कोटी 62 लाख 47 हजार 250 रूपयांचा निधी प्रधानमंत्री राष्ट्रीय कोषागरात जमा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)