रेराचा सकारात्मक परिणाम नाही; देशभर घरबांधणी प्रकल्पांना विलंब

मुंबई व दिल्लीत प्रकल्पांना होत आहे जास्त उशीर

नवी दिल्ली: गेल्या वर्षी स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी रेरा कायदा लागू करण्यात आल्यानंतरही अनेक गृहबांधणी प्रकल्पांना विलंब होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख सात शहरांत 5.76 लाख सदनिकांचे 4,64,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना विलंब होत आहे असे ऍनारॉक या संपत्ती सल्लागार कंपनीने म्हटले. या प्रकल्पामध्ये काही 2013 मध्ये अथवा त्यापूर्वी सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबई परिसर आणि दिल्ली परिसरातील प्रकल्पांना विलंब होण्याची संख्या जास्त आहे. मुंबई उपनगरीय विभागामध्ये आणि एनसीआरमध्ये संख्येच्या बाबतीत 71 टक्‍के आणि मूल्याच्या बाबतीत 78 टक्‍के प्रमाण आहे.

यापूर्वी प्रोइक्विटी हा कंपनीकडून या क्षेत्रासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालातील आकडेवारीपेक्षा आताची संख्या जास्त आहे. प्रोइक्विटीने 3.33 लाख कोटी रुपयांचे 4,65,555 युनिट्‌स उशिराने चालू आहेत, असे म्हटले होते.
गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी सरकारकडून नियम करण्यात आल्याने पारदर्शकता आणि सुलभता येण्यास मदत झाली. रेरा आणि जीएसटी अशा क्रांतिकारी कायद्यानंतरही ग्राहकांसाठी समाधानकारक बदल दिसून येत नाहीत. वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेरा लागू करण्यात आला आहे, मात्र काही राज्यात त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही. कर्नाटकात पूर्ण झालेल्यापैकी 60 टक्के प्रकल्पांना रेरा लागू नाही, असे पुरी यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)