रेणुका देवस्थानच्या वासंतिक नवरात्रोत्सवाला भाविकांचा प्रतिसाद

शेवगाव – चालू वर्षापासून श्रीक्षेत्र अमरापूरच्या (ता. शेवगाव) श्री रेणुका देवस्थानात मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या वासंतिक नवरात्रोत्सवास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
बुधवारी (दि. 18) झालेल्या घटस्थापनेनंतर प्रत्येक माळेला भाविकांची गर्दी चंद्रकलेप्रमाणे वाढली. या काळात अनेक मान्यवर, संत-महंतांनी नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावली. तर, 25 तारखेला सांगता महोत्सवाच्या निमित्ताने सामवेद पारायण, शतचंडी यज्ञ, प्रधान हवन व पूर्णाहुती कार्यक्रमप्रसंगी येथे काही परदेशी पाहुणेही खास उपस्थिती लावणार आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानच्या संपूर्ण परिसराला विद्युत रोषणाईने लखलखीत केले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. रविवारी (दि. 25) सांगता कार्यक्रमाच्या वेळी जागतिक पातळीवर अग्रेसर असलेल्या डेरेक डेअरी सोल्युशन या न्यूझीलॅंडच्या कंपनीचे कार्यकारी अधिकारी डेरेक फिअर वेदर, जयन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक प्रवीण चिरा, तसेच डॉ. रेड्डी फार्मासिट्युकल कंपनीचे माजी संचालक डॉ. अभिताभ मुखर्जी हे मान्यवर स्वागत करण्यात येणार आहे. रेणुका मल्टिस्टेटचे प्रवर्तक प्रशांत भालेराव, रेणुका प्रॉडक्‍शनचे प्रमुख योगेश भालेराव हे सध्या सांगता कार्यक्रम नियोजनात व्यग्र आहेत.

आज श्री रेणुका देवस्थानात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शतचंडी हवन कार्यक्रम पार पडला. भगवती भक्‍त चंद्रकांत भालेराव व मंगलताई भालेराव दिवसभर पूजेसाठी बसले होते. उद्या सकाळी साडेनऊला पूर्णाहुती होऊन घट उत्थापन होणार आहे. साडेअकराला महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. यावेळीही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. वेदशास्त्रसंपन्न सच्चिदानंद देवा, तुषार देवा, अप्पा कुलकर्णी यांच्यासह 11 ब्रह्मवृंदांनी नवरात्रोत्सवातील सर्व पूजा विधी पार पाडल्या. तर, भजनसम्राट भारस्कर यांनी राजोपचार पार पाडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)