रेडिमिक्‍स ठरणार वाळूला पर्याय

साताऱ्यात बालाजी केमिकल्सचा उपक्रम

कोरेगाव – बालाजी कन्स्ट्रक्‍शनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिकांना बाजारपेठेतील इतरांपेक्षा 40 टक्के कमी दराने बांधकामाचे गॅरेंटेड केमिकल उपलब्ध करण्यात आल्याने व्यवसायिकांच्या खिशातील पैसे बचत होवून बांधकाम व्यावसायिकांचा दुहेरी फायदा होणार असल्याची रमेश उबाळे यांनी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालाजी केमिकलमध्ये कॉंक्रिट ऍडमिक्‍चर, वॉटर प्रुफिंग, केमिकल्स, ग्राऊड, वॉलपुट्टी, लाईटवेट ब्लॉक जॉइंडर मार्टर, मायक्रो कॉंक्रिट, कॉंक्रिट बॉंडिंग एस. बी. आर, टाईल अँडीसिव, सिमेंट केमिकल रेडीमिक्‍स आदी केमिकल उपलब्ध आहेत. तसेच बांधकाम स्लॅबचे कॉंक्रिटसाठी आमचेकडे असलेले स्लॅबच हे केमिकल वापरल्यास कॉंक्रिटची स्ट्रेंथ वाढते. तसेच बांधकामासाठी आवश्‍यक असणाऱ्या लाईटवेट विटा, फरशीतील दरजा भरण्यासाठी ब्राउट, प्लाष्टरसाठी वाळू उपलब्ध न झाल्यास वाळू, सिमेंट व इतर केमिकल वापरून बनवलेली रेडीमिक्‍स प्लाष्टरची बॅगा कंपनीत उपलब्ध आहेत.

मातकट वाळू वापरल्यानंतर भिंतीना क्रॅक पडतो. परंतु, हे क्रॅक पडू नयेत म्हणून व प्लास्टरला ताकद यावी, म्हणून प्लास्टरमध्ये आमच्याकडे असलेले प्लाष्टर कॉन, ए. डब्ल्यू. हे केमिकल वापरल्यास भिंतीला चिऱ्या पडणार नाहीत. पालीकोट बिबी हे केमिकल वॉटर प्रुफिंगसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हा कोट केल्यानंतर स्लॅबवरील पाणी, स्टील गंजणे, प्लास्टर पडणे असे धोके अजिबात होत नाहीत. “बालाजी’मध्ये हे केमिकल प्रॉडक्‍ट अतिशय दर्जेदार व माफक दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती रमेश उबाळे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)