रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप गांधी

चिंचवड – रेडिओलॉजिस्ट संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड, मावळ, चाकण या परिसराची वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचवड येथे संपन्न झाली. सर्वानुमते डॉ. प्रदीप गांधी यांची अध्यक्षपदी व डॉ. रितु लोखंडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

डॉ. संतोष सबनिस व डॉ. योगेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी तर डॉ. अमोल मेहता यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. मावळते सचिव डॉ. सचिन कोल्हे यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. डॉ. संदीप पानसरे आणि डॉ. राहुल आगळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संतोष सबनीस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधव कुलकर्णी यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)