रेडिओलॉजिस्टच्या मागण्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही; राज्यस्तरीय चर्चासत्र

शिर्डी – रेडिओलॉजिस्टतज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह बैठक आयोजित करुन सकारात्मक मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
शिर्डी येथे रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशनच्या राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्‌घाटन अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. के. मोहनन, डॉ. अमरनाथ, डॉ. रवी आलुलवार, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. गिरीश महिंद्रकर आदी उपस्थित होते.
या वेळी मुनगंटीवार म्हणाले, की पीसीपीएनडीटी कायदयातील काही तरतुदीमुळे निरपराध डॉक्‍टरांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्र्यासह बैठक आयोजित करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. रेडिओलॉजिस्टच्या एकूण प्रक्रियेत महिला तज्ज्ञांचा मोठा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यविषयक सेवाही वाढल्या आहेत. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानली जाते. यासाठी समाजपरिवर्तनामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे ठरते. रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांच्या या तीन दिवसीय चर्चासत्रातील चिंतन व त्या सर्व ज्ञानाचा लाभ समाजाला व्हावा.
या वेळी राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)