रेडिएशन ऍन्ड मायक्रोवेव्हवर “जयहिंद’मध्ये कार्यशाळा

नारायणगांव, दि. 26 (वार्ताहर) – कुरण येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे गुरुवारी (दि. 19) यशस्वी इलेक्‍ट्रॉनिक्‍स पुणे यांच्याशी झालेल्या करारांतर्गत रेडिएशन ऍन्ड मायक्रोवेव्ह या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत रेडीएशन ऍन्ड मायक्रोवेव्ह क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ यांनी दिली. या कार्यशाळेला किरण इस्तके, यशस्वी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, पुणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयहिंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ व विभागप्रमुख डॉ. व्ही. एम. धेडे, सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी प्रा. स्वप्निल गाडेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले, तर प्रा. अमोल ताबे यांनी सूत्रसंचालन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)