रेडा शाळेला पालकांनी ठोकले टाळे

रेडा- वारंवार मागणी, निवेदने देऊन सुद्धा रेडा (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक मिळनसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. पालक विद्यार्थ्यांसह आज (शनिवारी) शाळेत आले अन्‌ शाळेलाच ताळे ठोकून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवित शाळेसमोर ठिय्या मांडाला.
रेडा येथील प्राथमिक शाळेचा पट 60 असून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग येथे भरतात; त्यामुळे शाळेत कायम दोन शिक्षक गरजेचे आहेत; परंतु शिक्षकण विभागासह आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे वारंवार मागणी, निवेदने देऊन सुद्धा पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच आमदार भरणेंकडून हक्काचा शिक्षक दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शौक्षणिक नुकसान होत आहे, जर त्वारीत शिक्षक दिला नाही तर शाळेला टाळे ठोको अशा आशयाचे निवेदन इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे शनिवारी (दि. 4) देण्यात आले होते. तसेच बावडा पोलिसांनाही निवेदन देण्यात आले होते. परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून याही निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखविल्याने पालक आक्रम झाले अन्‌ त्यांनी आज थेट शाळा गाठत शाळेला टाळे ठोकले. त्यानंतर शाळेच्या प्रागंणात ठिय्या आंदोलन करीत शिक्षक आम्हाला दिलाच पाहिजे अशा मागणी लाऊन धरली. यावेळी बावडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी धनंजय गायकवाड, धीरज देवकर, कैलास पवार, नानासाहेब देवकर, विजय देवकर, रोहिदास भोसले, उंबराव देवकर, तुकाराम देवकर, सचिन जगदाळे, भारत पवार, रणधीर कांबळे, तानाजी मोहिते, चंद्रकांत शिंदे, सिद्धेश्‍वर देवकर, विकिन गुळवे, चंद्रशेखर देवकर, नवनाथ देवकर, सिताराम मोरे, उत्तम पवार यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

  • … तर तीव्र आंदोलन
    इंदापूर पंचायत समितीच्या माध्यमातून रेडा येथील प्राथमिक शाळेला जर शिक्षक पाच दिवसांत शिक्षक दिला नाही, तर उग्र आंदोलन करू असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
  • आंदोलनाचा “स्टंट’ नको होता -शिक्षणाधिकारी
    हे आंदोलन होण्यापूर्वी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार होता. त्यानंतर शिक्षण अधिकारी आर. आर. बामणे यांनी एक ऑगस्टपासून शिक्षक उपलब्ध करून दिला असून संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान देखील करीत आहेत, त्यामुळे आंदोलनाचा “स्टंट’ नको होता, अशी माहिती शिक्षण अधिकारी आर. आर. बामणे यांनी दिली.
What is your reaction?
205 :thumbsup:
118 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)