रेडा येथे आमटी-भाकरीचा भंडारा सुरू

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील रेडा गाव हे तसे पाहिले तर नाथांची पांढर म्हणून प्रसिद्ध असून येथील सर्जेनाथ देवस्थान गावचे ग्रामदैवत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून गावकऱ्यांच्या सामुदायिक आमटी-भाकरीच्या भंडाऱ्या पासून तब्बल एक महिना आमटी-भाकरी व सांजा यांचा भंडारा सुरू होतो. त्याच प्रथेप्रमाणे यंदाही आज (रविवार) या भंडाऱ्यास सुरुवात झाली.
रेडा गावातील सर्जेनाथ देवस्थानाला अनेक भाज्यांची एकत्रित आमटी बनिवण्यात येते. व चुलिवरील गरम भाकरी,धान्याच्या पिठापासून बनविलेला सांजा अशी अनोखी मेजवानी स्वतःच्या घरून तांट-तांब्या घेऊन येवून मंदिराच्या आवारात मोठ्या चवीने गावकरी करतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा श्रावण महिन्यात व धर्मनाथ बिजेला जपली जाते. शेतकऱ्यांच्या शेतात जेवढ्या भाज्या येतात, त्या भाज्या एकत्र करून, सकाळच्या प्रहरापासून ही आमटी चुलीवर शिजवली जाते. याच ठिकाणी भाकरी व सांजा बनविला जातो व पाचच्या सुमारास आरती करून, पेडां शिपंत नाथबाबाचे चांगभंल म्हणून पगंतीला सुरुवात होते.
गावातील नागरिकांचे महिनाभर या ठिकाणी नंबरनुसार असे भंडारे होतात; परंतु पहिला भंडारा सामुहिक असतो. या भंडाऱ्यासाठी शिधा गावातील प्रत्येक घरातून नागरिकांनी स्व खुशीने देतात व यातूनच श्रावणातील पहिला दिवसाचा मान गावकऱ्यांना मिळतो. जात-पात-धर्म याचा कुठेही लवशेश न ठेवता गावातील लहान थोर मंडळी संध्याकाळची न्याहरी याच ठिकाणी करतात. विषेश म्हणजे लहान मुले देखील भंडाऱ्यातील आमटीचे भूरके चाखतात. याची चव ही निराळी असल्याने गावाशेजारी असणाऱ्या गावातील नागरिक देखील मोठ्या आवडीने या भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे श्रावण महिना म्हटले की रेडा गावकऱ्यांना घरचा उत्सव वाटतो. अनेक पै पाहुणे, परगावी असलेले नागरिक देखील आवराजून येतात व पगंतीत बसून जेवणाचा आनंद घेतात. गावातील लोकांची या देवस्थानवर मोठी श्रद्धा असल्याने मोठे अन्नदान घडते, हे मात्र नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)