रेडमी कडून पहिला ‘नॉच’डिस्प्ले स्मार्टफोन सादर

ऍपलने गतवर्षी भारतासह जागतिक बाजारपेठे मध्ये आयफोन ‘एक्स’ सादर केल्यापासून जगभरातील ‘स्मार्टफोन्सच्या’ चेहऱ्या-मोहऱ्या मध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन्समध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून ‘डिस्प्ले’च्या वरच्या व खालच्या बाजूला वापरण्यात येणाऱ्या ‘फ्रेम’ला कात्री लावत स्मार्टफोनच्या समोरील भागात जास्तीत जास्त डिस्प्ले देण्याची ऍपलची शक्कल ग्राहकांच्या चांगलीच पचनी पडल्याचे चित्र आहे. परंतु आयफोन ‘एक्स’चा नॉच डिस्प्ले अनेकांना भावला असला तरी तो सगळ्यांना परवडलेच असं नाही, नेमकी हीच बाब लक्षात घेत अनेक अँड्रॉइड-स्मार्टफोन मेकर्सने आयफोन एक्स सारखेच ‘नॉच’ डिस्प्ले असणारे स्मार्टफोन्स कमीत कमी किमतीमध्ये सादर करण्याचा धडाका लावला आहे. या स्पर्धेमध्ये आता ‘बजेट-सेगमेंट’ मध्ये आघाडीची मानली जाणाऱ्या ‘एमआय’ने देखील उडी घेत, रेडमी ६ प्रो हा स्मार्टफोन सादर केला आहे. पाहुयात काय खासियत आहे स्मार्टफोनमध्ये 

डिस्प्ले: या स्मार्टफोनचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे या स्मार्टफोनचा ‘नॉच’ डिस्प्ले! रेडमी ६ प्रो मध्ये १४.८ सेंटिमीटरचा नॉच डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्युशन फुल एचडी देण्यात आले आहे. नॉच डिस्प्लेमुळे निश्चितच हा स्मार्टफोन आकर्षक दिसतो.

बॅटरी: या स्मार्टफोनची दुसरी खासियत म्हणजे यामध्ये ४००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. मोठी बॅटरी असल्याने हा स्मार्टफोन निश्चितच चांगला बॅकअप देऊ शकणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा स्मार्टफोन २ दिवसांचा बॅकअप देऊ शकेल, परंतु ४००० क्षमतेची बॅटरी वापरण्यात आलेल्या अन्य फोनची कामगिरी पाहता ही बॅटरी तुम्हाला १.५ (दीड) दिवसाचा बॅकअप देऊ शकेल असा अंदाज आहे.

कॅमेरा: सदर स्मार्टफोनमध्ये १२ व ५ मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रेडमी ६ प्रमाणे पुढील बाजूचा कॅमेरा हा ५ मेगापिक्सेलचा असल्याचा अंदाज आहे.

मेमरी, प्रोसेसर व रॅम: रेडमी ६ प्रो हा स्मार्टफोन दोन मॉडेल मध्ये सादर करण्यात येणार असून, एका मॉडेल मध्ये ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरी तर दुसऱ्या मॉडेल मध्ये ४जीबी रॅम व ६४ जीबी मेमरी देण्यात येणार आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर वापरण्यात येणार आहे.

किंमत: कंपनीद्वारे या स्मार्टफोनची किंमत ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरीसाठी १०,९९९ तर ४जीबी रॅम व ६४ जीबी मेमरीसाठी १२,९९९ एवढी ठेवण्यात आली आहे.

खिशाला परवडेल अशा किमतीत रेडमी ६ भारतात दाखल!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)