“रेडझोन’ हद्दीत अनधिकृत “होर्डिंग्ज’चे पेव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीचा काही भाग लष्कराच्या “रेडझोन’ने बाधित झाला आहे. या बाधित जागेत खासगी संस्थांकडून मोठमोठे “होर्डिंग्ज’ लावले जात आहेत. अशांवर कारवाई होत नसल्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयाचे चलन बुडत असून लष्कराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा अनधिकृत “होर्डिंग्ज’वर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निगडी येथील सजग नागरीक सतिश कदम यांनी केली आहे.

यासंदर्भात कदम यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “रेडझोन’ हद्दीत लष्कराच्या नियमानुसार खासगी बांधकाम करण्यास निर्बंध घातले आहे. तर, सामाजिक शांततेचा विचार करून लष्कराच्या हद्दीतील वहिवाटीचे रस्ते देखील लष्कराकडून बंद केले जातात. तरीही, “रेडझोन’ हद्दीत अनधिकृत “होर्डिंग्ज’ची संख्या दिवसें-दिवस वाढत चालली आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उंच “होर्डिंग्ज’ लावले आहेत. त्यासाठी संबंधित ठेकेदाराने महापालिकेची परवानगी घेतली आहे का?, याबाबत चौकशी करण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. तसेच, दापोडी, बोपखेल परिसरातही अशीच परिस्थिती आहे.

भक्ती-शक्ती चौकात श्रीकृष्ण मंदिराशेजारी दोन जाहिरात कंपन्यांनी पाच उंच फ्लेक्‍स लावले आहेत. त्यासाठी अतिउंच लोखंडी सांगाडे उभे केले आहेत. लष्कर हद्दीत लोखंडी सांगाडे अथवा मनोरे उभारण्यास परवानगी दिली जात नाही. तरीही, ठेकेदारांकडून बेकायदेशीरपणे “होर्डिंग्ज’ लावून पैसे लाटण्याचा उद्योग सुरू आहे, अशा ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)