रेखा यांचे ऐश्वर्या राय बच्चनला भावनिक पत्र !

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या रायला भावनिक पत्र लिहिले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दोन दशके पूर्ण केल्याच्या निमित्ताने रेखा यांनी ऐश्वर्याला पत्र लिहिले. या पत्रात रेखा यांनी ऐश्वर्याचे तोंडभरुन कौतुक केले होते. पण हे पत्र मॅग्झिनमध्ये छापून आल्यानंतर अखेर रेखा यांनी पत्र नेमके का लिहिले अशी चर्चा रंगू लागली.

रेखा, बच्चन कुटुंबाच्या फार जवळ नाहीत. सार्वजनिक ठिकाणी अमिताभ बच्चन रेखा यांना कायम टाळताना दिसतात. रेखा समोर आल्यावर औपचारिकता म्हणून जया आणि अभिषेक त्यांना नमस्कार करतात. तर ऐश्वर्या राय बच्चन रेखा यांना खुल्या मंचावर ‘मां’ म्हणून हाक मारते. ऐश्वर्याचे कौतुक करण्याची रेखा यांची ही पहिलीच वेळ नाही. एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या आणि रेखा यांच्यातील खास नात दिसले होते.

‘माझी अश’ असं लिहून रेखा यांनी पत्राची सुरुवात केली आणि स्वत:चा ‘रेखा मां’ असा उल्लेख करत शेवट केला होता. पत्रात त्यांनी ऐश्वर्याने साकारलेल्या अनेक भूमिकांवर मत मांडले. “तू प्रत्येक भूमिकांना न्याय दिलास. मग तो खऱ्या आयुष्याशी संबंधित असो वा फिल्मी. तू परिपूर्ण आहेस. कोणालाही सिद्ध करुन दाखवण्याची तुला गरज नाही,” असे रेखा यांनी पत्रात लिहिले आहे.

पुढे रेखा लिहितात की, “पण आराध्याच्या आईची तुझी भूमिका, मला सर्वाधिक आनंद देते. तुला खूप आनंद मिळो, अशी प्रार्थना करते. खूप प्रेम, आयुष्यमान हो… रेखा मां.” ऐश्वर्या राय रेखा यांना ‘मां’ बोलते. ‘जब्जा’ सिनेमासाठी रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्या म्हणाली होती की, “मां कडून हा पुरस्कार स्वीकारणे हे सन्मानाची गोष्ट आहे.” त्यावर रेखा यांनी उत्तर दिले की, “यापुढेही अनेक वर्ष तुला पुरस्कार देऊ शकेन, अशी आशा आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)