रेकॉल्ड कामगार कुटुंबियांचे व्यवस्थापनाविरोधात धरणे

पिंपरी- कोणतीही पूर्वकल्पना न देता रकॉल्ड थर्मो कंपनीने 97 कायम कागारांना अचानकपणे बडतर्फ करुन ऐनदिवाळीच्या सुट्टयांमध्ये कंपनीतील साहित्य हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याविरोधात दाद मागूनही व्यवस्थापनाकडून कोणतेही सहकार्य लाभत नसल्याच्या निषेधार्थ या कामगारांच्या कुटुंबियांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

व्यवस्थापनाने कामगारांना तीन दिवस पगारी सुट्टी देऊन एका रात्रीत कंपनीतील साहित्य बाहेर नेले. 1 नोव्हेंबरला कामगारांना बडतर्फीचे पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये मशिनरी कालबाह्य झाले असल्याचे सांगून कंपनी बंद करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे 97 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे. त्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले होते. भविष्यात हे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

रेकॉल्ड कंपनी वॉटर हिटरच्या उत्पादनात चाकण येथे 21 वर्षांपासून कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीमधील ही एक नावाजलेली कंपनी असून, या कंपनीच्या उत्पादनांना बाजारपेठत मोठी मागणी आहे. सहा महिन्यांपुर्वीच कामगार व व्यवस्थापन यांच्यात समाधानकारक वेतनकरार झाला होता. त्यामध्ये 14 हजार रूपयांची वेतनवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये कामगारांना 35 टक्के वेतनवाढ देण्यात आली होती. अचानकपणे व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे या कामगारांवर आभाळच कोसळले आहे. कामगारांनी या विरोधात औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे.

गेली 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची व्यवस्थापनाने दखल घेतलेली नाही. आता कामगारांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. व्यवस्थापनाच्या अप्रिय निर्णयामुळे आमच्यावर कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया कामगार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

कंपनी व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाविरोधात संघटनेने औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे. याची दखल घेत, कंपनीतील मशिनरी हलविण्यास न्यायालयाने स्टे दिला आहे. तसेच शुक्रवारी (दि.16)या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली आहे.
अनिल रोहम,
कामगार नेते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)