रेकॉल्डच्या 97 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

पिंपरी – चाकण येथील रेकॉल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्थलांतराचा घाट घातला आहे. कामगारांना तीन दिवस पगारी सुट्टी दिली आहे. त्यामुळे कामगारांत नोकरीविषयी असुरक्षितता निर्माण झाली असून कंपनी गेटवर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

रेकॉल्ड कंपनी वॉटर हिटरच्या उत्पादनात चाकण येथे 21 वर्षांपासून आहे. औद्योगिक वसाहतीमधील ही एक नावाजलेली कंपनी असून कंपनीच्या उत्पादनाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच कामगार व व्यवस्थापन यांच्यात 35 टक्के वेतन वाढीचा करार झाला होता. सध्या कंपनी व्यवस्थापन कामगार विरोधी धोरण राबवत असल्याची टिका कामगार करीत आहेत. कामगारांनी याला विरोध केला आहे. तरीही तुम्हाला हवे तेवढे वेतन देऊ, असे आश्‍वासन देऊन कंपनी व्यवस्थापनाने तीच भूमिका कायम ठेवली आहे. कामगारांनी या विरोधात औद्योगीक न्यायालयात दाद मागितली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यवस्थापनाने एका रात्रीत कंपनीतील साहित्य बाहेर नेले. राज्याबाहेर उत्पादन केले जात आहे.1 नोव्हेंबरला कामगारांना बडतर्फीचे पत्र देण्यात आले. कंपनी उत्पादने व मशिनरी कालबाह्य झाले असल्याचे सांगून कंपनी बंद करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. शहरातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन कामगारांनी केले आहे. संपर्क न होऊ शकल्याने व्यवस्थापनाची भूमिका समजू शकली नाही.

कंपनी व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. बहुतांश कामगार मध्यम वयीन असून व्यवस्थापनाच्या या एका रात्रीतील निर्णयामुळे त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अनिल रोहम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)