रेकॉर्डिंग स्टुडिओत घुसून रेडिओ जॉकीची हत्या

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये एका रेडिओ जॉकीची स्टुडिओत घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश उर्फ रसिकन राजेश असे हत्या झालेल्या ३६ वर्षीय आरजेचं नाव आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती जखमी झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रसिकन राजेश हा रेडिओ जॉकीसह लोकगायकही होता.

राजेश आणि त्याचा मित्र कुत्तन स्टेज शोनंतर स्टुडिओमध्ये परतले. स्टुडिओमध्ये सामान ठेवत असताना लाल रंगाच्या स्वीफ्ट कारमधून अज्ञात व्यक्ती बाहेर आल्या आणि त्यांनी धारदार शस्त्राने राजेश आणि त्याच्या मित्रावर हल्ला केला. हा हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने लगेचच राजेश आणि त्याच्या मित्रांला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण, उपचारादरम्यानच राजेशचा मृत्यू झाला. त्याचा मित्र कुत्तन याच्यावर तिरुवअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)