“रेकॉर्ड’वरील सराईत गुन्हेगाराला अटक

पिंपरी – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूससह यांच्यासह गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कासारवाडी मधील दर्ग्याजवळून जेरबंद केले.

केविन जॉर्ज अँथोनी (वय-23, रा. मोरया पार्क, विल्यमनगर, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी कासारवाडी येथे सापळा रचून केविन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तूल खोचलेले आढळून आले. त्यामध्ये तीन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. केविन याने ही दोन्ही पिस्तूल आणि काडतूस मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणली असल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्याला 19 ऑक्‍टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, दीपाली मरळे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, राजू केदारी, प्रमोद लांडे, अमित गायकवाड, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, स्वप्नील शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)