रेंशनिग काळबाजारप्रकरणी धान्य गोदाम लिपीकास कोठडी

दौंड- दौंड बाजार समितीच्या आवारात सुरु असलेल्या रेशनिंगच्या काळाबाजारप्रकरणी एकनाथ लव्हाजी गुणाले (वय 25 रा. दौंड) धान्य गोदाम लिपिक यांना अटक झाली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार दि. 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गोदाम लिपिकाच्या अटकने पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामधे घबराट पसरली असल्याचे चित्र दिसत आहे. दौंडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन आडत्यांच्याकडे रेशनिंगचा गहू आढळल्याने दोन व्यापाऱ्यांसह टेम्पो चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, याच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आरोपी सुरेंद्र बलदोटा आणि राजेंद्र शिंदे यांची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांनाही न्यायालयासमोर हजर केले असता राजेंद्र शिंदे याची पोलीस कोठडी दि. 22 तारखेपर्यंत वाढवण्यात आली. सुरेंद्र बलदोटा याला न्यायालयीन कोठडी मिळाली. बलदोटा याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला. आज सुनावणीच्या दरम्यान तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे व अनेक मोठे मासे तपासात निष्पन्न होण्याची शक्‍यता असल्याने आजपर्यंत अटक केलेल्या आरोपींना अधिक पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेझ हक यांनी लक्ष घालून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाच्या सूचना दिल्याने अशा प्रकरणात पहिल्यांदाच पोलिसांनी अधिक तपास करून सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणातील जप्त केलेल्या वाहनांचे चालक फरार असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्‍यता आहे. पोलिसांचा तपासाचा रोख पाहता रेशनच्या काळाबाजाराची साखळी उघड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

  • रेशनिंग दुकानदारांमधे भीतीचे वातावरण
    पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजारप्रकरणी काही दुकानदारांकडे चौकशी केली असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्‍यातील रेशनिंग दुकानदारांमधे भीती निर्माण झाल्याची चर्चा तालुक्‍यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)