रेंगाळलेल्या कोटेश्‍वर पुलाचे काम होतय गतीमान

सातारा – कोटेश्‍वर पुलाचे रेंगाळलेले काम गतीमान झाल्याने परिसरातील नागरिकांना व व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. या पुलावरील वाहतुक अनेक दिवसापासून बंद आहे. याचा फटका नागरिकांबरोबरच वाहतूक व्यावसायिकांनाही बसला आहे.

वाहतुक व्यवस्थेला पूरक ठरणार हा मार्ग बंद असल्याने नागरिक व वाहन चालकांना गडकर आळी मार्गे वळसाघालून प्रवास करावा लागतो. विशेषत: जेष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांना अनेक दिवसापासून या समस्येला सामोरे जावे लागते आहे. पूलाचे रुंदीकरण व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांची मागणी होती. यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन या पुलाच्या रुंदीकरणाचा शुभारंभ केला. सध्या या कामाला गती आल्याने नजीकच्या काळात या पूलाचे रुंदीकरण होऊन तो नागरिकासाठी खुला होईल. यामुळे या मार्गवरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्‍न ही कायम स्वरुपी निकालात निघणार आहे. कोटेश्‍वर पुलाचे काम गतीमान झाल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त होत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)