रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 230 जणांवर कारवाई

पुणे – शहरात विविध भागात भरधाव वेगात दुचाकी-चारचाकी वाहने चालवून स्मार्टपणा दाखविणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महिन्यातभरातच अशा प्रकारे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 230 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 77 हजार एवढा दंड वसुल करण्यात आला आहे.

दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. यातच मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते, यातच दुतर्फा पार्क केलेली वाहने यामुळे वाहनांना रस्ते अपुरे पडत चालल्याची स्थिती आहे. अशा परिस्थिीतत जोरदार वाहने चालवणाऱ्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशांवर कारवाई करण्यात येते. शहरातील बहुतांश रस्ते रात्री मोकळे असतात. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांकडून रॅश ड्रायव्हिंगचे प्रमाण जास्त असते. जोशात वाहने चालविताना अपघात घडतात. यात प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. दीडशे, दोनशे सीसीपेक्षा जास्त क्षमतेची वाहने तरुणाईकडे आहेत. यामुळे त्यावरुन स्मार्टपणा दाखवत जोरदार वाहने चालवली जातात. मात्र, अशा पध्दतीमुळे जास्त अपघात होतात. यामुळेच वाहतूक पोलिस यावर लक्ष ठेवून आहेत.

77 हजार दंड वसूल 
वाहतूक पोलिसांनी महिन्याभरात रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 230 जणांवर कारवाई केली असुन त्यांच्याकडून 77 हजार 200 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरस्पिडिंगमुळे अपघात घडण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)