रॅली ऑफ अरुणाचलमध्ये अमित्रजित घोषची बाजी

एमआरएफ एफएमएससीआय आयएनआरसी तिसरी फेरी

इटानगर: टीम महिंद्रा ऍडव्हेंचरच्या अमित्रजित घोषने एमआरएफ एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली अजिंक्‍यपद 2018 च्या तिसऱ्या फेरीतील रॅली ऑफ अरुणाचलमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. घोषने पहिल्या दिवशी आपली चमक दाखवत नवव्या वरून थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. पण, सहाव्या स्टेजला गौरव गिलच्या कारमध्ये बिघाड झाल्याचा फायदा हा अमित्रजित घोषला मिळाला. त्याने दिवसाच्या तीन स्टेजमध्ये सावधपणे खेळ केला.

त्याने एसएस 5 मध्ये दुसरे, एसएस 6 मध्ये तिसरे आणि एसएस 7 मध्ये दुसरे स्थान मिळवले.त्याने 00:57:33.6 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. आयएनआरसी 2 मध्ये फाल्गुना उर्स आणि श्रीकांत यांनी चमक दाखवली त्यांच्यापेक्षा ही वेळ 5.9 सेकंदने जलद होती. स्नॅप रेसिंला गटात दोन चौथे स्थान आणि एका पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

फाल्गुनाने केलेली कामगिरी ही आयएनआरसी 2 मध्ये विजय मिळवून देण्यास पुरेशी होती.माजी चॅम्पियन कर्ण कदुर (पीव्हीएस मुर्थी सह) यांनी एसएस 6 गटात दुसरे आणि एसएस 7 गटाचे जेतेपद मिळवले. पण, त्यांना दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. कदुरचा आर्का मोटरस्पोर्टसचा सहकारी राहुल कांथराज (विवेक भटसह) यांना तिसऱ्या स्थानी रहावे लागले. आयएनआरसी 3 गटात अनेक बदल पहायला मिळाले. आघाडीवर असणारा सुहेम कबीर (जीवारथीनम सोबत) यांना दिवसाच्या पहिल्याच स्टेजमध्ये अडचणीचा सामना करावा लागला. त्याचा फायदा त्यांचा टीम चॅम्पियन्सचा संघसहकारी व गटविजेता डीन मॅस्के-हेनस (श्रुप्था पाडीवाल ) याने जेतेपद पटकावले. अरुर विक्रम राव (सोमय्या ए जी) आणि फुरपा त्सेरिंग (चॉव टिकथा) यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

सविस्तर निकाल :
आयएनआरसी- अमित्रजित घोष/अश्विन नाईक (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर, 00:57:33.6), फाल्गुना उर्स/श्रीकांत (स्नॅप रेसिंग, 00:57:39.5), डीन मॅस्के-हेन्स/श्रुप्था पाडीवाल(टीम चॅम्पियन्स, 00:57:57.7).
आयएनआरसी 1 : अमित्रजित घोष/अश्विन नाईक (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर,00:57:33.6), 2)लोकेश गोवडा/वेनु रमेश कुमार (टीम चॅम्पियन्स , 01:07:20.8)
आयएनआरसी 2 : फाल्गुना उर्स/श्रीकांत (स्नॅप रेसिंग, 00:57:39.5), कर्ण कदूर/पीव्हीएस मुर्थी (आर्का मोटरस्पोर्टस , 00:58:37.0), राहुल कांथराज/विवेक वाय भट (आर्का मोटरस्पोर्टस, 00:58:55.2)
आयएनआरसी 3 : डीन मॅस्के-हेन्स/श्रुप्था पाडीवाल (टीम चॅम्पियन्स, 00:57:57.7), अरुर विक्रम राव/सोमय्या ए जी (फाल्कन मोटर स्पोर्टस, 01:05:17.0), फुरपा त्सेरिंग/चॉव टिकथा (फुरपा त्सेरिंग, 01:14:57.9)
एफएमएससीआय 2 डब्ल्युडी कप : आदिथ केसी/ अर्जुन एसएसबी (टीम चॅम्पियन्स,01:01:20.0), रक्षिथ अय्यर/सागर मालप्पा (रक्षित अय्यर, 01:10:54.4).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)