रॅलीस परवानगी नाकारल्याने केंद्र सरकारचा निषेध

श्रीरामपूर – तालुक्‍यातील राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात व परिवर्तन रॅली कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्याबद्दल निषेध करून पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना निवेदन देण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात परिवर्तन रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीला गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे रोखण्यात आले. परंतु गुजरात सरकारने जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनास हाती धरुन बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रेचा समारोपीय कार्यक्रमाची परवानगी रद्द केली.
सदर प्रकार हा संविधानातील कलम 1 चा उल्लंघन करणारा आहे. त्या विरोधात कलम 19 चे उल्लंघन करणाऱ्या प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी मूलभूत हक्क व संविधानाचे संरक्षण करण्यासाठी दि.22 ऑक्‍टोबर 2018 रोजी संपूर्ण देशभरात 31राज्यांमध्ये 550 जिल्ह्यांमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाने जुपीएस्सीद्वारा परिक्षा न घेता निवड करण्यात येईल.यामध्ये आरक्षणाचा विचार केला जाणार नाही, असे केंद्र शासनाचे म्हणणे आहे. यामध्ये अनुच्छेद 15 (4), 16 (4), अनुच्छेद 315 ते 323 कलमांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे.याचाही तीव्र निषेध करण्यात येत आहे.

त्याचाच क भाग म्हणून श्रीरामपर तालुक्‍यातील राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती संघटनेच्यावतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बहिरट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश चौदंते, तालुकाध्यक्ष सुरेश भोसले, तालुका सचिव गोरख हिवराळे, एम. एस. गायकवाड, ता. उपाध्यक्ष अर्जुन मोरे, दाविद गायकवाड, ऍड. वाव्हळ, ता. सहसचिव पंडीतराव पगारे, ता. कोषाध्यक्ष उत्तमराव रणपिसे, विश्वास भोसले, नंदू भोसले, श्रीमंत भोसले, राजू सोनवणे, दत्तू भोसले, भामुमोचे आर. एम. धनवडे, सुधाकर बागूल, डी. एल. भोंगळे, सुधाकर भोसले, रियाज पेंटर, मुश्‍ताक तांबोळी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)