रूपीनगर मंडळाच्या पाचही शाखांना आयएसओ

निगडी – येथील रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानदीप विद्यालय व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्य विद्यालय, ज्ञानदीप विद्या मंदिर, ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल आणि तळवडे येथील राजा शिव छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास 9001:आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्‌टी परिसरातील गरीब, कष्टकरी, श्रमिक व कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्ता वाढीसाठी सतत कार्यरत असणारी शिक्षण संस्था असा नावलौकिक मिळवलेल्या रुपीनगर शिक्षण संस्था संचालित पाचही शाखांना हे मानांकन प्राप्त झाले आहे.

सर्व शाखांतील शाळांमध्ये अनेक विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रम घेतले जातात. इ. 10 वी व इ. 12 वी निकालाची उत्कृष्ट परंपरा, शाळेचा निसर्गरम्य शांत व स्वच्छ परिसर, संस्थेचे उत्तम व्यवस्थापन व नियोजन, ज्ञानदीप व्याख्यान माला, सौरऊर्जा प्रकल्प, गांडूळ प्रकल्प आदी निकषांवर हे प्रमाणपत्र सिस्टीम क्वालिटी ऍसेसर्सचे संचालक प्रशांत निघवेकर यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत भसे यांना प्रदान करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष शांताराम भालेकर, सचिव भागवत चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष बाजीराव गारगोटे, खजिनदार दशरथ जगताप, सुधाकर दळवी, संपत भालेकर, हेमलता सरोदे, दयानंद सोनकांबळे, सुबोध गलांडे, सुनिल गारगोटे, रोहिदास शिंदे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)