रुबीमध्ये आठवडयाभरात तीन यशस्वी हृदय प्रत्यारोपण

पुणे- गेल्या आठवड्याभरात रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये तीन जणांवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आले असून तिघांना जीवनदान मिळाले आहे. या वर्षी आरोग्य विभागाकडून रुबी हॉल क्‍लिनिकला हृदय प्रत्यारोपणाचा परवाना मिळाला आहे. त्यानंतर आतापर्यंत सहा जणांवर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
आठवडयाभरात 16 ते 29 वयातील तीन रुग्णांवर रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या तिन्ही रुग्णांना कार्डियोमायोपॅथी नावाचा हृदयविकाराचा आजार झाला होता. त्यांचे हृदयाची क्षमता पूर्णतः कार्यान्वित नव्हती. त्यामुळे त्यांना प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. रुबी हॉल क्‍लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या सातत्याने आम्ही संपर्कात असतो. परंतु, ज्यावेळी एखाद्या रुग्णाचे जीवन बदलून जाते, त्याला नवे आयुष्य लाभते. त्यावेळी प्रत्येकाला जीवन हे मूल्य असते याची जाणीव होते. रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर कार्यरत आहेत. त्याशिवाय अवयव दान करणारे दाते देखील रुग्णालयातच होते. त्यामुळे हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आम्ही एकाच वेळेस करू शकलो. सांघिक कौशल्य, तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्‍टरांचे ज्ञान आणि समन्वयामुळे एवढ्या मोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्‍य झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, आमच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सामाजिक बांधिलकीच्या वृत्तीमुळे रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये देशातील चांगले अद्ययावत हृदय प्रत्यारोपण केंद्र उभे राहिले. हृदय शल्यविशारद, तीनही रुग्णांवर हृदय प्रत्यारोपण कऱण्यात आले ते सुखरुप आहेत. ज्या तीन दात्यांनी अवयव दिले, त्यांच्यामुळे तिघांना जीवदान मिळाले आहे. परंतू, अद्ययावत वैद्यकीय उपचारामुळे ते शक्‍य झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)