“रुपे’ कार्ड आणि “भीम’ऍपच्या वापराबद्दल कॅशबॅक…

नवी दिल्ली – “जीएसटी’ अंतर्गत “रुपे’ कार्ड आणि “भीम’ ऍपच्या माध्यमातून डिजीटल व्यवहारांसाठी राज्यांककडून प्रायोगिक तत्वावर प्रोत्साहन द्यायला सुरुवात होईल. ज्या राज्यांनी स्वतःहून प्रायोगिक यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला, तेथेच याचा अंमलबजावणी होईल.

तेथील महसूलाची वाढ किंवा तूट तपासून बघितली जाईल, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. अर्थमंत्री गोयल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या “जीएसटी’ संचालक परिषदेच्या बैठकीमध्ये “एमएसएमई’ शी संबंधित विषयांबाबत विचार करण्यासाठी अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांच्या नेतृत्वाखाली एका मंत्रीगट स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे कायदा आणि प्रक्रियेशी संबंधित विषयांबाबत विचार विधी समितीद्वारे केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)