विलीनकरणाची प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याची मागणी
पुणे – गेले काही वर्षापासून रुपी बॅंकेवर असलेल्या आर्थिक निर्बंधाना पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) याबाबतचे आदेश रुपी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाला पाठविले आहेत, दरम्यान रुपीच्या विलीनकरणाची प्रक्रिया त्वरीत करावी अशी मागणी प्रशासकीय मंडळाने केली आहे.

रिझर्व्हं बॅंक ऑफ इंडियाने रुपी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर संचालक मंडळ बरखास्त करुन त्याठिकाणी प्रशासकीय मंडळ नेमले आहे. या प्रशासकीय मंडळाच्यावतीने गेले काही वर्षापासून रुपी बॅंकेचे कामकाज पाहण्यात येत आहे. प्रशासकीय मंडळाने केलेल्या कामामुळे यंदा रुपीचा तोटा तब्बल वीस कोटीने कमी करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वसूली करण्यात प्रशासकीय मंडळाला यश आले आहे.
बॅंकेच्या आर्थिक निर्बंधाना मुदत वाढ मिळल्याबाबतची माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडीत यांनी आज दिली.ते म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेला 31 मे पर्यंत रुपी बॅंकेबाबत काय भुमिका घेतली याबाबतचे आपले म्हणणे सादर करायचे आहे.त्यामुळेच आम्हाला आरबीआयने ही मुदत वाढ दिली आहे. मुदत वाढ ही आमची मागणी नाही तर बॅंकेची स्थिती आता झपाट्याने सुधारत आहे त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने पुढाकार घेऊन बॅंकेच्या विलीनकरणाची प्रक्रिया सुरु करावी त्यासाठी राज्य शासनाने सुद्धा पुढाकार घ्यावा.

वाई अर्बन बॅंकेने रुपी बॅकच्या विलीनकरणाची तयारी दर्शविली आहे, त्यांनी याबाबत थेट आरबीआयला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. लवकरच प्रशासकीय मंडळाची आरबीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे.ही बैठक येत्या दोन दिवसात होणार आहे.या बैठकीबाबत आम्ही खुपच सकारात्मक असल्याचे ही पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)