रुपीनगर येथे भीषण आग

पिंपरी – रुपीनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर मधील गोसावी हॉस्पिटलच्या शेजारी भंगारचे गोडाऊन आहे. दुपारी चारच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोट हवेत पसरत होते. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर येथील दोन, तळवडे येथील एक आणि प्राधिकरण येथील एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अडीच तास आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र या आगीमध्ये गोडाऊन पूर्णपणे जाळून खाक झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. योग्य सुरक्षा बाळगल्याने आग आजूबाजूच्या परिसरात पसरली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)