रुपया शक्‍य तितक्‍या लवकर स्थिरावण्याची गरज 

कोलकाता: रुपयात अचानक होणारे चढ-उतार चांगले नाहीत, त्यामुळे रुपया शक्‍यतितक्‍या लवकर स्थिरावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे समूह आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांनी केले. आयसीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात सहभागी होण्यासाठी सौम्यकांती घोष येथे आले होते. त्या वेळी त्यांना प्रसारमाध्यमांना सांगितले की, अलीकडे रुपयामध्ये क्रमबद्ध पद्धतीने घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पाच ते सहा महिन्यांत रुपया 64 वरून 70 वर गेला आहे. म्हणजेच एक डॉलरची किंमत 64 रुपयांवरून 70 रुपये झाली आहे. रुपया 72 वर गेला किंवा कसे हा मुद्दाच नाही. अचानक होणारी वाढ किंवा घट योग्य नाही. त्यामुळे बाजारात सतत अस्थिरता निर्माण होत राहते. जीडीपीच्या घोष म्हणाले, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर 7.7 टक्के राहण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण वित्तवर्षात तो 7.5 टक्‍के राहण्याचा अंदाज आहे. नोटाबंदी व जीएसटी यांचा अर्थव्यवस्थेवरील दुहेरी परिणाम आता ओसरला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)