रुपया लवकरच स्थिरावेल: सुभाषचंद्र गर्ग 

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था मुळात मजबूत असल्यामुळे रुपया लकरच स्थिर होईल असा दावा केंद्रीय वित्तीय व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी केला. ते म्हणाले की, रुपयाचे मूल्य 68 ते 69 या पातळीवर स्थिर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या काही आठड्यापासून परदेशी गुंतवणूक वाढू लागली आहे. चीनने जर युआन या आपल्या चलनाचे अवमूल्यन केले तर त्याचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की, त्यामुळे सर्वच देशांच्या चलनावर परिणाम झाला तरच भारताच्या चलनावर परिणाम होऊ कतो. मात्र तसे होण्याची शक्‍यता कमी असल्याचे त्यांनी सांगिंतले.
दरम्यान भारताजवळ मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरण्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ते म्हणाले की, भारताजवळ 400 अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन आहे. त्यामुळे भारताला आवश्‍यक बाबीच्या आयातीला निधी कमी पडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने त्यातील काही डॉलरचा वापर करून गेल्या तीन महिन्यापासून रुपयाला स्थिर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)