रुपया घसरल्यामुळे परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण कमी 

नवी दिल्ली, दि. 11-क्रुडचे दर वेगाने वाढल्यामुळे भारताची चालू खात्यावरील तूट वाढत आहे. त्याचबरोबर या कारणामुळे रुपयाच्या मूल्यावरही परिणाम होत आहे. या बाबी परदेशी गुंतवणूकदारांना नफादायक नसल्यामुळे सप्टेंबर महिन्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 5600 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. या महिन्यात केवळ 5 दिवस कामकाजाचे होते. मात्र, तरीही परदेशी गुंतवणूकदारांनी एवढी मोठी रक्‍कम परत नेली आहे.
शेअरबाजाराने दिलेल्या माहितीनुसार या काळात 1021 कोटी रुपयांच्या शेअरची परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री झाली. त्याचबरोबर या काळात या गुंतवणूकदारांनी 4628 कोटी रुपयांचे कर्जरोखे विकून टाकले. रुपया स्थिर झाल्याशिवाय या क्षेत्रात गुंतवणूक वाढणार नसल्याचे बोलले जाते. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)