रुपया घसरल्यामुळे कर्ज परतफेडीवर होणार परिणाम 

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात भारताला 222 अब्ज डॉलर्सचे अल्पकालीन कर्ज फेडण्याचे आहे. ही रक्कम देशाच्या एकूण विदेशी चलन साठयाच्या 52 टक्‍के एवढी आहे. मार्च 2019 पर्यंत सरकारला ही कर्जाची रक्कम फेडावयाची आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअरबाजारातून पैसा काढण्यात येत आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डॉलरची मागणी वाढल्याने विदेशी चलन साठयात घसरण होत आहे. यामुळे रुपया कमजोर होत आहे. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 5 टक्‍क्‍यांनी घसरला आहे.
यामुळे आरबीआयने आपल्याकडील 20 अब्ज डॉलर्सची विक्री केली. विदेशातून आयात वाढत असल्याने अल्पकालीन मुदतीच्या कर्जात वाढ होत आहे आणि देशातील डॉलरचा साठा वाढत असल्याचे दिसत नाही. यामुळे रुपयावर दबाव आल्याने महागाई वाढण्याची शक्‍यता आहे. आयात वाढल्याने चालू खाते तूट वाढण्याची अंदाज आहे.
रुपया कमजोर झाल्याने आरबीआयकडून विशेष रोखे आणण्यात येण्याची शक्‍यता आहे. सरकार आणि आरबीआयने 1999 आणि 2013 मध्ये रोखे बाजारात आणले होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)