रुपया घसरल्याने सोने महागणार…

जागतिक अस्थिरतेमुळे चांदीचेही भाव वाढणार? 
नवी दिल्ली – डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय भू-राजकीय आव्हानांचा परिणाम यामुळे सोन्याच्या किंमती वाढू शकतात, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतीय बाजारात दिवाळीमध्ये सोन्याचे भाव 30 हजार ते 34 हजार रुपये प्रतितोळा राहू शकतात. कॉमट्रेंडज रिस्क मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनी ही शक्‍यता व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय आव्हानांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. याशिवाय भारतीय रुपयाचे अवमूल्यन होत असून डॉलर दिवसेंदिवस बळकट होत आहे. रुपयाच्या या अवमूल्यनाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून दिवाळीपर्यंत यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. असे ज्ञानशेखर त्यागराजन म्हणाले. सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे, कारण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळतोय त्यामुळे सोन्याच्या किमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कमोडिटी अँड करन्सीच्या मॅनेजिंग डायरेक्‍टर प्रीती राठी यांनी दिवाळीमध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा 31,500 ते 31,800 हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. जागतिक पातळीवर ताणतणाव निर्माण झाल्यास ग्राहक सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि सोन्याच्या दरात वाढ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)