वॉशिंग्टन: या वर्षात आतापर्यंत रुपयाचे मूल्य 9 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. मात्र त्यात काळजी करण्यासारखे काही नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, काही जागतिक घडामोडीमुळे या काळात डॉलर वधारला आहे. प्रत्यक्षात रुपया कमकुवत झालेला नाही तर वधारलेल्या डॉलरच्या तुलनेत तो कमी झाल्याचे भासत आहे.
केवळ रुपयालाच नाही डॉलर वगळून जगातील प्रत्येक चलनावर याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारताच्या आयात आणि निर्यातील संतुलनावर या घडामोडीचा फारसा परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, फक्‍त रुपयाचे मूल्य कमी झाले असते तर चिंतेचे कारण होते. मात्र सर्वच चलनांचे मूल्य कमी होत असल्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. त्याचबरोबर भारताकडे 400 अब्ज डॉलरपेक्षा जास्त डॉलरचा साठा आहे. तो भारताची आयातीची गरज भागविण्यास आणि रुपया स्थिर ठेवण्यास पुरेसा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)