रुपया कोसळून तेरा महिन्यांच्या नीचांकावर

मुंबई – डॉलर वधारत असतानाच रिझर्व्ह बॅंकेने कडक पतधोरणाचे संकेत दिल्यानंतर शुक्रवारी रुपयांचे मूल्य 32 पैशांनी कोसळले. गेल्या पाच दिवसांपासून रुपया घसरत आहेत. आज रुपयाचे मूल्य प्रति डॉलरला 66.12 रुपयांवर गेले. या अगोदर 10 मार्च 2017 ला हे मूल्य 66.60 रुपयांपर्यंत गेले होते.

क्रूड महागल्याने चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे गेल्या पंधरवड्यात रुपयांचे मूल्य कमी होत होते. त्यातच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ थांबण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे डॉलरची खरेदी होऊन रुपयांचे मूल्य कमी झाले असल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सूचित केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)