रुपया कोसळल्याने महागाई भडकणार

इंधन महागणार असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्‍यता
परदेशी पर्यटन व शिक्षणाचा खर्च
अधिक लागणार

नवी दिल्ली, रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत मजबूत झाल्याने कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलांच्या किमतीत घट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट होत होती. मात्र, रुपया पडल्यास या किमती पुन्हा उसळी खाऊ शकतात. तसेच परदेशातून देशात आयात होणाऱ्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. या अधिकच्या किंमतीचा थेट भार सामान्यांच्या खिश्‍यावर पडेल.

रुपयांची किंमत पडल्याने परदेशात भटकंती करणे महाग होणार आहे. अनेक देशांमध्ये डॉलरमध्ये कारभार चालतो. चलन बदल करून घेताना डॉलरच्या तुलनेत अधिक भारतीय चलन खर्च होईल. परदेशातील शिक्षणाचा त्याचबरोबर परदेशी पर्यटनाचा खर्च वाढू शकतो. कारण भारतीय चलनाची किंमत कमी झाल्यास परदेशातील चलन खर्च करणे महाग ठरू शकते. तेथील शैक्षणिक खर्च, फी, हॉस्टेलचे भाडे आणि चलन बदल करून घेण्यासाठी जास्त रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत मजबूत झाल्यास परदेशातून येणाऱ्या गोष्टी महाग होतील. भारत जेथे जेथे डॉलरने व्यवहार करतो तिथे जास्त रुपये मोजावे लागणार. म्हणजे भारताचा आयात खर्च वाढणार आणि नेहमीप्रमाणे याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार.

भारताला लागणाऱ्या एकूण पेट्रोलियम पदार्थांपैकी 80 टक्‍के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जातात. पेट्रोल पदार्थचे आयात मूल्य वाढणार त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या देशांतर्गत किमतींमध्ये अचानक वाढ करतील डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने कच्च्या मालाचा प्रवास खर्च वाढेल ज्यामुळे महागाई वाढेल. पेट्रोलियम पदार्थांबरोबरच भारताच्या आयात वस्तूंमध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या दैनंदिन जीवनातील दोन गोष्टी म्हणजे खाद्य तेल आणि डाळी. अर्थात आयात खर्च वाढल्याने तेल आणि डाळींच्या किंमतीही वाढतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)