नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात रुपयाच्या मूल्यात बरीच घट होऊन रुपयाचे मूल्य आता 72 रुपये प्रती डॉलरच्या आसपास आहे. हे मूल्य वधारून पुन्हा 69 रुपये प्रती डॉलरच्या पातळीवर गेले नाही तर काही कारचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. होंडा कार कंपनीने तसे संकेत दिले आहेत. या कारचे जास्त सुटे भाग भारतातच तयार होतात त्याकारचे दर फशर वाढणार नाहीत मात्र ज्या कारचे बरेच सुटे भाग आयात करावे लागतात त्या कारचे दर जास्त प्रमाणता वाढण्याची शक्‍यता आहे. कारर रुपया घसरल्यामुळे त्याना आयात महागात पडत आहे.
होंडा कारचे उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी सांगितले की, आम्हाला भारतातील उत्सवाच्या काळामुळे कारचे दर वाढविण्याची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही थांबलो आहोत. जर रुपयाचे मूल्य वधारले नाही तर आम्हा दर वाढविण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा लागणार आहे. या अगोदरही कंपनीने रुपया घसरल्यामुळे आणि महागाईचा दर वाढल्यामुळे काही कारचे दर 35 हजार रुपयांपर्यंत वाढविले होते. महागाई वाढल्यामुळे कच्चा माल महाग घाल्याचे कंपनीचे म्हणणे होते. इतर कंपन्यानीही या काळात आपल्या वाहनांच्या दरात वाढ केली होती. आता पुन्हा कंपन्या त्या दृष्टिकोनातून आकडेमोड करीत असल्याचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)