रुपयाच्या मूल्ल्यात मोठी घट

मुंबई – वाढलेली चालू खात्यावरील तूट आणि जागतिक पातळीवर वाढलेल्या भूराजकीय तणावामुळे क्रूडच्या दरात झालेल्या वाढीमुळे रुपयाचे मूल्य गुरुवारी सकाळी 69.10 प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले. नंतर यात थोडीशी सुधारणा झाली.

मात्र तरिही रुपयाचे घसरणे ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चिंतेची बाब आहे. कारण त्यामुळे क्रूडसह इतर आयात महाग होऊन एकूणच महागाई भडकण्याची शक्‍यता वाढत असते. त्याचबरोबर यामुळे परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. आगामी काळात रुपयाला कोणत्या पातळीवर ठेवण्यासाठी रिझर्व बॅंक आणि अर्थमंत्रालय काय प्रयत्न करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)