अर्थव्यवस्था मजबूत : मुबलक परकीय चलन उपलब्ध 
नवी दिल्ली: रुपया योग्य मूल्याकडे मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे कसल्याही चिंतेचे कारण नाही, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी नाबार्डने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना सांगितले. गेल्या तीन वर्षात रुपयाचे मूल्य 17 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मात्र या वर्षात आपार्यंत रुपयाचे मूल्य केवळ 9.8 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे.
मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर रुपयाचे योग्य मूल्य ठरत आहे. रुपया जास्त मजबूत असणे म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी फार चांगले असते अशा गैरसमजात कोणी राहू नये, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले की, रुपया फारच बळकट झाल्यास त्यामुळे निर्यात करणाऱ्यांना मोठा प्रश्‍न निर्माण होतो. भारताला निर्यात वाढविण्याची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारताचा विकास दर जगात सर्वात जास्त आहे, आणि तो आणखी वाढणारच आहे. निर्यात वाढू लागली आहे. कृषी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढत आहे. रोजगार निर्मितीत वाढ होत आहे. या बाबी अर्थव्यवस्था भक्‍कम असल्याचे निर्देशक असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राच्या वाढलेल्या उत्पादकतेची स्तूती करतांना ते म्हणाले की, भारत अगोदर कृषी उत्पादनाची आयात करीत होता. आता साखर, दूध, गहू, कांदा अशा पिकांच्या अतिरिक्‍त उत्पादनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ईतरही पिकांचे उत्पादन वाढत आहे. त्यासाठी आपल्याला निर्यातपेठेचा वापर करावा लगणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता पुन्हा वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)