रुपयाचे मूल्य घसरल्याने कॉंग्रेसचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

नवी दिल्लीः डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आत्तापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ दाखवून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. यूपीए सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालल्याचा आरोप करणारे आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे उत्तर मागणारे मोदी आता स्वतः उत्तर देणार का?, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.

स्वीस बँकेतील काळा पैसा मायदेशी आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. पण, स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा ५० टक्क्यांनी वाढल्याचा आकडा समोर आला आहे. गेल्या वर्षभरात स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवी ७ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, रुपयाची घसरगुंडी सुरूच आहे. एका डॉलरची किंमत ६८.७९ रुपये झालीय. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याचीही भीती निर्माण झालीय. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर शरसंधान केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेसनं नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ स्क्रीनवर दाखवला. त्यात मोदी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल उत्तर मागताहेत. ‘डॉलर मजबूत आणि रुपया कमकुवत होत असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. ते असेच राहिले तर जागतिक बाजारपेठेत भारत टिकू शकत नाही. व्यापाऱ्यांचे आणि सरकारचेही त्यात नुकसान आहे. पण दिल्लीचे सरकार उत्तरे देत नाही.

नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेच्या चलनाला डॉलरच्या तुलनेत काहीच फटका बसत नाही, मग भारताचा रुपयाच का पडतोय? भ्रष्ट राजकारणामुळेच हे झाले आहे’, असा आरोप मोदी या भाषणात करताहेत. आता तशीच परिस्थिती राओला सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींनी मनमोहन यांना विचारलेले प्रश्नच आता काँग्रेसने मोदींना विचारले आहे.

https://twitter.com/INCIndiaLive/status/1012604517051822080

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)